विस्मयकारक सजीव सृष्टी
पराक्रम
संदेशवाहक कबुतरांचे
गरीब आणि त्याच बरोबर खेळकर
स्वभावाच्या कबुतरांना जगभरात शांतिदूताचा मान आहे. शांतिदूत म्हणून त्यांनी जगाची
खरोखरच किती सेवा केली आहे, ह्याचा परिपूर्ण अंदाज लावणं कठीण आहे. मात्र 'दूत' म्हणून
जगाच्या एका इतिहासावर अमीट आणि प्रभावी अशी छाप त्यांनी नक्कीच सोडली आहे. त्यांच्या
ह्या कामगिरीचा साद्यंत आढावा आपल्याला याच प्रकरणातून घ्यायचा आहे पण त्याआधी एक छोटीशी
नोंद आपण घेऊ या, ती कबूतर मानवाचा दूत म्हणून मोठ्या प्रमाणात सेवेत कधी दाखल झाला
त्याची. नोंद जुनी इ.स. ११४६ मधली आहे. ह्या वर्षी बगदादचा सुलतान नसुरूद्दीन खलिफाने
१००० कबूतरांच्या साहाय्याने संदेशवाहक सेवा सुरू केली. ती पुढची जवळजवळ ११२ वर्षे
सुरू होती. १२५८ मध्ये मोंगल आक्रमणानंतर ती बंद पडली.
नुरुद्दीन
खालिफाने सुरू केलेली सेवा बंद पडली तरी. जगात कबुतरांचा संदेशवाहनासाठी होणारा
वापर थांबला असे मात्र नव्हते त्याची त्रोटक माहिती आपल्याला नंतर घेता येईल. त्याआधी
थोडी शास्त्रीय माहिती कबुतराच्या एकूण ३०० निरनिराळ्या प्रजातीतील आहेत त्या सर्वांचाच
संदेशवाहक म्हणून उपयोग करता येत नाही ह्या ३०० प्रजाती एक प्रजाती आहे. तिला इंग्रजीमध्ये
होमिंग पिजन (homing pigeon) असे म्हटले जाते, ह्याच प्रजातीचा उपयोग होतो. काही किंवा
शेकडो किलोमीटर नव्हे तर अगदी हजारो किलोमीटर दूर अंतरावरून देखिल आपलं मूळ स्थान शोधून
काढण्याची ह्या कबुतरांची क्षमता हा शास्त्रज्ञांसाठी नेहमीच अंचव्याचा विषय राहिला
आहे. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा ते दिशाशोधनासाठी वापर करून घेतात. ह्या निष्कर्षाप्रत
वैज्ञानिक आले असले तरी ही प्रक्रिया नेमकेपणाने उलगडते. अजुनपर्यंत तरी त्यांना शक्य
झालेले नाही. थोडक्यात पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र हा कबुतरांच्या दिशाशोधनात महत्त्वाची
भूमिका पार पाडतं.
दिशाशोधाच्या बाबतीत
कबुतराच्या स्वतःच्या नैसर्गिक क्षमता जरी उच्च असल्या तरी त्याना संदेशवाहक म्हणून कामाला ठेवण्या आधी
पुरेस प्रशिक्षण द्याव लागतं. ह्या प्रशिक्षणाची सुरुवात कबुतराच्या जन्मानंतर
चारेक आठवड्यांनी होते. कबूतर जन्माला आलेल्या घरट्यापासून, प्रशिक्षक ह्या
कबूतराना जवळ जवळ २०० ते ३००मीटर लांबपर्यंत घेऊन जातो तेथून तो त्यांना मोकळे
सोडतो. मोकळी सोडलेली कबूतरं हवेत उंच जातात. तेथेच गोलाकार उडत आजूबाजूचा प्रवेश न्याहाळतात
तेथून आपलं घरट दिसलं, की मग त्या दिशेने प्रवास सुरू करतात. हे प्रशिक्षण देताना
कबुतरांना आधी उपाशी ठेवलेलं असत मात्र ते त्यांच्या घरट्या पर्यंत पोहचताच
त्यांना त्यांचं खाणं मिळेल ह्याची व्यवस्था केलेली असते. अन्नाच्या अपेक्षेने का
होईना पण कबुतरं घरट्यापर्यंतचा प्रवास वेगाने पूर्ण करतील, हे त्यामागच लॉजिक
आहे. काही दिवसाच्या सरावानंतर घरट्याची जागा बदलून ते कबुतरांना शोधायला
लावण्याचा प्रयोग केला जातो. अंतरही वाढविले जाते. त्यामुळे कबुतरांच्या मेंदूत
चुंबकीय नकाशे तयार होणे आणि पारखणे ह्याची क्षमता वाढते असे मानले जाते.
अर्थात हा आधुनिक प्रशिक्षणाचा भाग झाला. पूर्वीच्या
काळी चुंबकीय क्षेत्राबाबत माहिती नव्हती. त्यावेळी ही लोकांना कबुतरांचं हे
हुन्नर चांगल्या प्रकारे माहित होतं. आणि त्याचा उपयोगही प्रभाविपणे केला जात
होता. युद्ध जिंकण्यात अस्त्र-शस्त्र डावपेच आणि योद्धे ह्यांनी जशी मध्यवर्ती
भूमिका अदा केली आहे, तशीच भूमिका संदेशवाहक कबुतरांसारख्या वरवर गरीब वाटणाच्या
पक्ष्यांनी पार पाडल्याचे दाखले इतिहासात नोंदविले गेले आहेत. केवळ संदेशवाहक
कबुतर वेळेवर पोहोचल्यामुळे नेदरलँडमधील लेडन नावाचे नगर क्रूर आणि रक्तपिपासू स्पॅनीश
आक्रमकांच्या ताब्यात जाण्यापासून बचावले होते. ही घटना घडली होती इ.स. १५७४
मध्ये. लेडन हे नेदरलँडमधील त्यावेळचं प्रमुख शहर होतं ह्या शहराचं वैशिष्ट्य
म्हणजे ते समुद्रसपाटीपासून १२ मीटर खोलीवर वसल्यामुळे शहराभोवती मोठा कोट
बांधण्यात आला होता. १५७४ च्या मे महिन्यात स्पॅनिश लष्कराने आक्रमण केल्यानंतर ह्या
कोटानेच लेडन शहराच रक्षण केलं. कोटाला असलेले शहरात शिरण्याचे दरवाजे बंद करून
घेण्यात आले. त्यामुळे स्पॅनिश लष्कराला शहराला वेढा घालून बसण्याव्यतिरीक्त दुसरा
मार्ग उरला नाही. मात्र हे शहर कसेही करून ताब्यात घ्यायचेच असे ठरवून आलेले
स्पेनियार्ड चिवटपणे तेथेच चिकटून बसले. वेढा चार महिने सुरू होता. ऑगस्ट महिना
संपतासंपता लेडनमधील अन्नधान्याचा साठा संपला. शहर वासियांची उपासमार होऊ लागली.
उपासमारीने मरणाच्यांची संख्या वाढू लागली. तसतशी नगरचे दरवाजे उघडण्यासाठी नगरचे रक्षण
करणा-या सेनापतीवर दबाव वाढू लागला. त्याने घातक परिणाम माहित असलेल्या सेनापतीने
अथीतच निर्धाराने त्याला नकार दिला. रणांयाची संख्या आणखी वाढली. जनतेच्याही
संयमाचा बांध तुटू लागला.
हा बांध खरोखरच एके दिवशी फुटला लोकांच्या टोळक्या
जमा होऊ लागल्या आणि सैनिकांच्या
विरोधाला न जुमानता नगरकोटांच्या दरवाज्याच्या दिशेने पुढे होऊ लागल्या. कोटाचे
दरवाजे उघडले जाणार आणि स्पॅनिश सैन्य आत शिरून कत्तल करणार हे जवळ-जवळ नक्की
झालेले असतानाच कुणाचीतरी नजर त्याच वेळी आकाशात फिरणाच्या कबुतरावर पडली.
कबुतराला पाहताच गर्दीचा उन्माद ओसरला.पुढच्याच काही सेकंदात ते कबुतर आपल्या
मालकाच्या घराजवळ उतरले. त्याच्या पायात संदेशाचा कागद गुंडाळण्यात आला होता. हा
कागद उलगडण्यात आला. तो नेदरलँडच्या नौसेनापतीने पाठविलेला संदेश होता. अस्त्र- शस्त्र
व रसदीसह लेडन वाचविण्यासाठी येत असल्याचे त्यांत म्हटल होत. हा संदेश नगरजनांना
वाचून दाखविण्यात आला. त्याबरोबर लोकात हर्षोल्हासाची एक लहर उठली. पूर्ण लेडन शहर
आनंदाच्या आरोळ्यांनी ठणाणून उठले, चर्चच्या घंटा वाजू लागल्या. त्या बाहेर लेडनचा
घास घेण्यासाठी टपून बसलेल्या स्पेनियाडीसाठी भयसूचक ठरल्या. वेढा उठवून निघून
जाणच चांगल असं ठरवून ते निघूनही गेले. अशा रीतीने एक संदेवाहक कबूतर सर्वांचे
मुक्तिदाते ठरले.
अशा अनेक युद्धातून- लढायातून कबुतरांनी लक्षवेधी कामगिरी बजाविली आहे. त्या सर्वच
कामगिरीच्यांचा आढावा येथे घेणं अशक्य आहे. मात्र इतिहासावर आणि एकूण मानवी भवितव्यावर
प्रचंड प्रभाव महायुद्धातील कबुतरांचा
वापर टाकणाच्या पहिल्या व दुस-या महायुद्धातील
कबुतरांच्या कामगिरीचा लेखा-जोखा मात्र मांडला जायलाच हवा असे वाटते. १९१४ ते १९१८
एवढ्या प्रदीर्घकाळ चाललेल्या पहिल्या महायुद्धाची व्याप्ती ब्रिटन, फ्रान्स,
जर्मनी बेल्झियम अशा एकूण नऊ देशांतून पसरली होती. ह्या देशातून संदेशवहनासाठी
टेलिग्राफच जाळं असली तरी ते युद्धकाळांत उद्ध्वस्त झालं मग ही जबाबदारी उचलली ती
कबुतरांनी. युरोपातल्या युद्धाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फटका अमेरीकेलाही बसू
लागल्यावर तीही १९१७ साली युद्धात उतरली. जनरल जॉन पर्शिगच्या नेत्तृत्वाखाली
अमेरिकन सेनेला लढायचं होतं. संदेशवहन व्यवस्था कोलमडली
होती. त्याचा फटका अमेरिकन सेनेला ठिकठिकाणी बसू लागला. युरोपियन
चुंबकीय क्षेत्राचा विशेष अभ्यास नसलेली अमेरिकन संदेशवाहक कबुतरं प्रभावी ठरत नव्हती
तेव्हा युरोपियन कबुतरं सवेत असावीत असं जन. जॉन पर्शिग ह्यांना वाटलं.
जन. पार्शिंग ह्यांनी मागणी केल्यावर ब्रिटीश लष्कराच्या
ब्रिटीश पिजन सर्विस ह्या संस्थेने आपल्याजवळील ६०० संदशवाहक कबुतरं चल आणि अचल स्थानकं
जन पार्शिंग ह्यांना सोपविली चल
स्थानकं ही एखाद्या जन, जॉन पर्शिग लष्करी गाडीच्या टपावरच तयार केलेली होती. लष्करी
हालचाली प्रमाणे तिही हलविली जात होती. पहिल्या महायुद्धात या कबुतरांनी प्रचंड पराक्रम
गाजवला हे सांगायला नकोच.
दुस-या
महायुद्धाच्या काळात वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीमुळे संदेशवहनाच्या तंत्रात बरीच प्रगती
झाली होती. तेव्हा संदेशवाहक कबुतरांचा वापर दुस-या महायुद्धात झाला नसेल, असं तुमच्या
मनात आलं असेल, तर ते चूक आहे. दुस-या महायुद्धात जवळ जवळ ५४,००० संदेशवाहक कबुतरांचा
वापर करण्यात आला कबुतरांची राहण्याची सोय असलेली फिरती स्थानके होता. हे कबुतरांचं
संदेशवहन योग्य प्रकारे व्हावं म्हणून ३००० लष्करी अधिकारीही नेमण्यात आले होते.
दुस-या
महायुद्धात भाग घेणा-या संदेशवाहक कबुतरांची संख्या जितकी मोठी आहे, तितकीच त्यांच्या
पराक्रमाची गाथाही. इटालीची राजधानी रोमच्या वायव्येला असलेल्या कासिनो ह्या पहाडी
प्रदेशात घडलेला एक प्रसंग येथे नोंदविण्यासारखा आहे. दस-या महायुद्धात इटालीचा हुकूमशाहा
मुसोलिनीने हिटलरशी दोस्ती केली आणि विटन अमेरिके सारख्या राष्ट्राशी दुश्मनी. परिणाम
सप्टेंबर १९४३ मध्ये दोस्ताच्या लष्करी आक्रमणांत झालं. समुद्रमार्गाने इटालीच्या किना-यावर
उतरलेलं दोस्तांचं लष्कर
गुसंडी मारत उत्तरेच्या दिशेत इटालीत खोलवर घुसू लागलं. मात्र लवकरच जर्मन
लष्कराची कुमक पाठवून हिटलरने ह्या डुक्कर मुसंडीला वेसण घातली, पावलापावलावर
दोस्ताच्या सेनेला ब्रिटीश आणि गोरखा सैनिक असलेली दोस्तांची एक तुकडी जर्मनांच्या
घेराबंदीत अडकली.
लवकरच ह्या तुकडीची अवस्था दयनीय झाली. तिचा दारूगोळा
संपला होता. संदेशवाहनासाठी कोणतीही साधन नव्हती. शिवाय विमानाद्वारे टाकली जाणारी
बहुतांश रसद जर्मनांच्या हाती जात होती त्यातून जर्मन तोफखाना त्यांच्यावर आग ओकत
होता. नऊ दिवस असेच निघून गेले. ह्या तुकडीला वेढ्यांतून बाहेर काढणे गरजेचं होतं म्हणून
ह्या तुकडीपर्यंत पोहोचण्याचा सुरक्षित मार्ग शोधून काढण्यासाठी तीन सैनिकांना
वेढ्याच्या आत घुसविण्याचा निर्णय घेण्यात आला. पहाडी प्रदेशाची दुर्गमता लक्षात
घेता अवजड संदेशवहन यंत्रणा घेऊन आत शिरणं अशक्य असण्याबरोबर धोक्याचही होतं.
शेवटी पिशव्यांमधून तीन संदेशवाहक कबुतरं घेऊन ही तीन शिलेदार वेगवेगळ्या
मार्गांनी तुकडीपर्यंत पोहचण्यास सज्ज झाले. तीन वेगवेगळ्या मार्गांनी पुढे
गेलेल्या ह्या शिलेदारापैकी एकाला जर्मन गोळीबारापुढे माघार घ्यावी लागली. मात्र
दोघे तुकडीपाशी पोहचले. लागलीच त्यांनी आपल्या प्रवास मार्गाचा नकाशा तयार करून तो
संदेशवाहक कबुतराबरोबर आपल्या मुख्यालयाकडे पाठवून दिला. वेढ्यात अडकलेल्या
तुकडीला सोडविण्याचे दोन मार्ग सापडल्यामुळे रात्रीच्यावेळी त्यांना सोडविण्यासाठी
अमेरिकन सैन्य आत शिरलं. रात्रभराच्या तुंबळ युद्धानंतर त्या तुकडीला सुखरूप बाहेर
काढण्यात यश आलं. नंतरच्या इटालीमधील लष्करी मोहिमांमध्ये ह्याच तुकडीने मोठा
पराक्रम गाजवला हा इतिहास आहे.
संदेशवाहक कबुतरांच्या बाबतीत १९५० च्या दशकात करण्यात
आलेल्या एका प्रयोगाची नोंदही
आपण घ्यायला हवी. हा प्रयोग पूर्वीच्या फ्रेंचांच्या ताब्यात असलेल्या इंडोचायना
आणि आत्ताच्या व्हिएतनाममध्ये असलेल्या सायगॉन शहरात करण्यात आला होता. ह्या
प्रयोगासाठी तरूण आणि ताकदवान कबुतरं निवडण्यांत आली होती. ह्या कबुतरासाठी एक
वेताच बास्केट तयार करण्यांत आलं. त्यात त्याला ठेवून जहाजाने फ्रान्सला
पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. जहाजातील अंधाच्या तळघरांत हे कबूतर असलेलं
बास्केट ठेवण्यात आलं होतं. हे जहाज आग्नेय आशियाला वळसा घालून हिंदी महासागर,
हिंदी महासागरातून लाल समुद्र, लाल समुद्रातून भूमध्य समुद्र व नंतर फ्रान्सच्या
किना-याला लागणार होतं फ्रान्सच्या किना-यावरून रेल्वेद्वारे हे कबूतर फ्रान्समधील
आरास (Arras) ह्या ठिकाणी नेण्यात आलं, ह्या संपूर्ण प्रवासादरम्यान कबूतराला
बाहेरच कोणतंही दृश्यं दिसणार नाही ह्याची काळजी घेण्यात
आली होती. आरासला पोहचल्यावर काही दिवस ह्या कबूतराला आराम करू देण्यात आला.
त्यानंतर ह्या कबूतराच्या पायात एक सांकेतिक क्रमांक टाकलेला तोडा घालून मोकळे सोडण्यात
आलं. आता हे कबूतर काय करतय, ह्याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली.
आरास-सायगॉन हे अंतर ११,२५०
किलोमीटर आहे. एक पश्चिम गोलार्धात तर दुसरे पूर्व गोलार्धात आहे. तरीही हे अंतर कबूतराने
केवळ २५ दिवसात कापलं आणि तेही न चुकता. ह्या बाबतीत कबूतराचा आणि स्वत:ला अत्यंत बुद्धीमान
समजणाच्या मानवाचा मुकाबला होणं अशक्य आहे.
अचूक दिशाशोधनाच्या बाबतीत
जसं कबूतर माणसाला मागे सोडतं तसच शौर्य निष्ठा आणि समर्पित वृत्तीच्या बाबतीतही ते
माणसाला खूप मागे सोडतं की काय अशी शंका त्यांच्या युद्धातील शौर्य गाथा वाचल्या की
मनात येते. सैनिकांच्या शौर्यगाथा आपल्या वाचनात नेहमी येत असतात मात्र कबुतरं किंवा
तत्सम पशुपक्ष्यांच्या शौर्यगाथा आपल्या नजरेआड राहतात. कबुतरांच्या अशाच व्यक्तिगत
शौर्यगाथा आता आपण पाहणार आहोत सुरूवात करू या ती चेर एमी(Char ami) पासून.
चेर एमी
चेर एमी
हा खरंतर फ्रेंच शब्द आहे. त्याचा अर्थ होतो ‘प्रिय मित्र’ असा. पहिल्या महायुद्धात
ब्रिटीशांनी अमेरिकन लष्कराला भेट दिलेल्या ह्या कबूतरांच नाव चेर एमी का म्हणून ठेवलं
हे समजायला मार्ग नाही. मात्र चेर ऐमी खरोखरच ‘प्रिय मित्र' आहे हे त्याने बॅटल ऑफ
ऑर्गानच्या लढाईत सिद्ध करून दाखविलं.
चेर एमी त्यावेळी अमेरिकेच्या
मेजर चाल्र्स व्हीटलेसी ह्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या बटालियनबरोबर होता. बटालियन
मध्ये ५०० सैनिक होते. ३ ऑक्टोबर १९१८ रोजी फ्रांन्स मधील ऑर्गोन येथल्या लढाईत ह्या
बटालियनवर एक संकट कोसळले. चढाईदरम्यान ही बटालियन आपल्या मेजर चार्ल्स व्हीटलेसी डिव्हिजनपासून वेगळी झाली आणि वाट चूकून जर्मनांच्या ताब्यातील
भूप्रदेशात शिरली. त्याचा घातक परिणाम झाला. ह्या बटालियनच्या स्थितीचा अंदाज
नसल्याने शत्रू समजून त्यांच्यावर ब्रिटीश, फ्रेंच आणि अमेरिकन तोफखान्याचा मारा होऊ
लागला. त्या सपाट्यात पहिल्याच दिवशी मेजर व्हीट्लेसीच्या बटालियनचे ३०० सैनिक मारले
गेले. आपल्याच बटालियनला बसलेला हा दोस्तांच्या तोफमा-याचा सर्वात घातक फटका होता मात्र
संदेश वहनाची योग्य व्यवस्था नसल्याने पुढची स्थिती आणखी बिकट होणार हे मेजर व्हीट्लेसीनी
ओळखले. बटालियनचा पूर्ण खात्मा होण्यापासून वाचविण्याची जबाबदारी होती ती संदेशवाहक
कबूतरांवर. मेजर व्हीट्लेसी त्यांनी बटालियनच्या नेमक्या स्थानाचा आणि परिस्थितीचा
हवाला देणारा सांकेतिक संदेश कागदावर लिहून तो एका नळीत बंद केला. ही नळी एका संदेशवाहक
कबूतराच्या पायाला बांधून ते सोडण्यात आले. मात्र जर्मनांनी दिसताक्षणी ठार मारण्याच्या
आदेशाचं तंतोतंत पालन करता त्याला कंठस्नान घातलं. दुस-या कबूतरामार्फत संदेश पाठविण्याशिवाय
दुसरा मार्ग नव्हता पण दुस-या कबूतराच्या भाळीही वीरमरण लिहिल होतं. आता बटलियनपाशी
एकच कबूतर बाकी राहिल होतं ते म्हणजे चेर एमी'. बटालियनच्या पूर्ण आशा चेर एमीवर होत्या.
आकाशातल्या बापाचं नाव घेत मेजर व्हीट्लेसीनी कागदावर पुन्हा एकदा संदेश लिहिला आणि
चेर एमीला आकाशात सोडले.
चेर
एमीने आकाशात भरारी घेतली. चुंबकीय नकाशांची उजळणी करण्यासाठी वरच्यावर चकरा
मारायला सुरूवात केली आणि त्याचबरोबर त्याच्या कसोटीलाही सुरूवात झाली. कसोटी जीवनमरणाची
आणि त्याचबरोबर कर्तव्यपालनाचीही होती. अन् त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्याला
ती एकट्यालाच पार पाडायची होती. चेर एमीला आकाशात पहिल्याबरोबर जर्मन शॉटगनचा भयंकर
मारा सूरू झाला. शॉटगन हे पक्षी मारण्याचं वेधक आणि खात्रीच हत्यार आहे. शॉटगनच्या
काडतुसात एकच गोळी असण्याऐवजी छत्र्याची मालिकाच असते. शॉटगन डागल्याबरोबर ह्या अनेक
छन्यांचा वर्षाव एकाचवेळी पक्ष्याच्या दिशेने होतो. त्यामुळेच शॉटगनचा वार सहसा निकामी
जात नाही. चेर एमीलाही त्याचा फटका बसला. एका छत्र्याने त्या एका डोळ्याचा वेध घेतला.
दुसरा छरा त्याच्या छातीत घुसला तेथलं हाड त्यामुळे तुटलं.
आकाशातून चेर एमीच्या पतनाला सुरुवात झाली काही क्षणातच ते जमिनीवर आपटेल असे
वाटत असतानाच त्याच्या पंखाची फडफड सुरू झाली. त्याने आकाशात भरारी घेतली. त्याच्या
भरारीबरोबरच जर्मन शॉटगनचा मारा पुन्हा सुरू झाला. त्यावेळी
शॉटगनचा घातक फटका चेर एमीच्या उजव्या पायावर बसला पाय तुटून खाली पडला.
मात्र
इतक्या सगळ्या घातक फटक्यानंतरही चेर एमी डगमगला नाही. शॉटगनच्या माध्याला तोंड देत
त्याने आपला प्रवास सुरू ठेवला एवढेच नव्हे तर जणू काही आपल्या कर्तव्याची जाणीव आहे,
असे दाखवतं त्याने आपल्या प्रवासाचा वेगही कायम ठेवला बटालियन अडकलेल्या ठिकाणापासून
चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या डिव्हिजनल हेडक्वार्टरपर्यंत पोहोचायला त्याला केवळ
२५ मिनिटे लागली ह्यावरून त्याची कल्पना येते. तो हेडक्वार्टरला पोहोचला तेव्हा मरणप्राय
अवस्थेत होता. मात्र त्याने वेळेत पोहोचविलेल्या संदेशामुळे तोफमारा थांबविण्यात आला.
उरलेल्या १९४ अमेरिकन सैनिकांना काढण्यासाठी कुमक पाठविण्यात आली. चेर एमीच्या साहसामुळे
१९४ सैनिकांचे प्राण वाचले, ही केवढी मोठी सिद्धी.
चेर
एमीची विजिगीषु वृत्ती तर पाहा! तो ह्या सगळ्या जीवघेण्या जखमांतूनही बरा झाला. तो
बरा झाल्यावर लष्करी पदकाने त्याचा सन्मान करण्यासाठी त्याला अमेरिकेत पाठविण्याचा
निर्णय घेण्यात आला. त्याला फ्रान्सच्या एका बंदरातून अमेरिकेत पाठविण्यात येणार होते.
तेथे त्याला निरोप देण्यासाठी दोस्तांचे सर्वोच्च सेनापती जनरल जॉन स्वतः जातीने हजर
राहिले हाही एक मोठा सन्मानच. असा हा १९४ सैनिकांचे प्राण वाचविणारा चेर एमी १३ जून
१९१९ रोजी मरण पावला. ह्या पराक्रमी चेर एमीचं मृत शरीर अमेरीकेच्या हिस्ट्री म्युझियममध्ये
टिकवून ठेवण्यात आलं आहे.
विलियम ऑफ ऑरेंज
झपाट्याने सतत साडेपाच तास उडत राहून दोन हजार सैनिकांचे प्राण वाचविणारे
हे कबूतर विलियम ऑफ ऑरेंजला विसरता येणे अवघड आहे. त्याच्या पराक्रमाबद्दल थोडेसे.
हिटलरच्या नाझी सैन्याने आपल्या विद्युतवेगी आक्रमणाचा
तडाखा देत नेदरलँड ह्या देशाला आपल्या पायाखाली तुडवलं. नेदरलँडला जर्मनांच्या
ताब्यातून सोडविणं गरजेचं होतं त्यासाठी १७ सप्टेंबर, १९४४ रोजी ब्रिटीश आणि
त्यांच्या सहकारी देशांचे २०,००० सैनिक पॅराशूटच्या साहाय्याने उतरविण्यात आले.
मात्र ह्या छत्रधारी सैनिकाच्या दुर्दैवाने त्यावेळचे हवामान बरोबर नव्हते.
त्यातही आणखी दुदैवाची गोष्ट म्हणजे विलियम ऑफ ऑरेंज ह्या हल्ल्याच्या
प्रतिकारासाठी जर्मन सैन्य तयार बसलं होतं. अर्महॅम शहराजवळ उतरलेल्या दोस्ताच्या २०००
सैनिकांना जर्मन सैनिकांचा वेढा पडला. दोस्तांच्या रेजिमेंटचे वायरलेस सेट बंद
पडलेले असल्याने बाहेरून मदत मिळविणे शक्य नव्हते. आता ह्या रेजिमेंटची ‘खटीया
खडी' होणार हे स्पष्ट झाले होते.
अशावेळी ह्या रेजिमेंटच्या मदतीला धावून आला तो विलियम
ऑफ ऑरेंज! मदतीचा SOS संदेश देऊन विलियम ऑफ ऑरेंजला पाठविण्यात आले. विलियमला जवळ
जवळ ४०० किलोमीटरची मजल मारायची होती. अर्नहॅम ते ब्रिटनमध्ये असलेलं विलियमचं
स्थानक ह्यामधील हे अंतर होत. विलियमने हे अंतर पाच तासात कापून काढलं. त्याचा
प्रवासाचा वेग होता ७२ किलोमीटर प्रतितास. विलियम ब्रिटनमध्ये पोहचल्यानंतर तेथे
उतरलेल्या इतर रेजिमेंटना अर्नहॅम येथल्या रेजिमेंटच्या मदतीला जाण्याचा संदेश
पाठविण्यात आला. साहजिकच २००० सैनिकांचे प्राण विलियमच्या असाधारण वेगवान
साहसामुळे वाचले.
ब्लॅकी हेरिंग्टन
हे आणखी एक शूर कबूतर पॅसिफीक महासागरात सोलोमन नावाचे बेट
आहे. ह्या बेटावर जपानी
आणि अमेरिकन सैन्यांत तुंबळ युद्ध सुरू होतं. सोलोमन बेट
जंगलाने आच्छादलेलं आहे. जंगलामधून रेडिओ लहरीद्वारे
होणारं बिनतारी संदेशवहन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे अमेरिकन लष्कर संदेशाच्या आदानप्रदानासाठी
कबुतरांचा वापर मोठ्या प्रमाणावर करत होतं हा वापर प्रभावीही ठरत होता.
एकदा ३०० जपानी सैनिक असलेल्या छुप्या तळाची माहिती मिळाल्यावर त्याची
बातमी अमेरिकन लष्करी मुख्यालयाला देण्यासाठी ब्लॅकी हेरिंग्टनची निवड करण्यात
आली. संदेश घेऊन ब्लॅकीने उड्डाण केलं जसा तो जंगलाचा आडोसा सोडून आकाशगामी झाला,
तसा तो जंगलात लपलेल्या एका जपानी सैनिकाच्या नजरेस पडला. जपानी सैनिक २५
कॉलिबर्सच रायफल घेऊन सज्ज होता. ब्लॅकीच्या दिशेने बार काढले जपानी चांगलाच
नेमबाज होता. त्याने डागलेल्या गोळ्यांनी ब्लॅकीच्या डोक्याचा तसेच छातीचा वेध घेतला.
तो धक्का सहन न झाल्याने ब्लॅकी पुन्हा जंगलात कोसळला. ब्लॅकी कोसळला म्हणजे मेल
नाही. त्याने सावरायला थोडा वेळ घेतला आणि सावरून आकाशात उड्डाण केलं.
मुख्यालयपर्यंत तो पोहचला तेव्हा तो अर्धमेला झाला होता. त्याची ती नाजूक स्थिती
पाहून त्याला शर्करायुक्त पाणी पाजण्यांत आलं मात्र हे पाणी त्याच्या छातीतून
बाहेर पडत होतं. तेव्हा त्याच्या जखमेला टाके घालून ती शिवण्यात आली. ब्लॅकीनेही
मृत्यूवर विजय मिळविला पुढे त्याचा लष्करी पदकाने सन्मान करण्यात आला.
जी.आय.जो.
जी.आय्.जो. हे नाव तुम्हाला
कदाचित कानावर पडल्यासारखं नक्कीच वाटलं असेल. तसं तुम्हाला वाटलं असेल तर तो तुमचा भ्रम आहे.
जी.आय्. जो.मधील ‘जो' हे ह्या कबूतराचे नाव. मात्र जी.आय्.ची फोड तुम्हाला
नक्कीच सांगितली पाहिजे इंग्रजी G. I. म्हणजे Government Issue. G.I. हे संक्षिप्त
स्वरूप अमेरिकन भूदलाच्या सैनिकांसाठी वापरलं जातं. जो च्या नावापुढे G. I. कसं
आलं ते आपण नंतर पाहू त्याआधी थोडं जो विषयी.
१९४३चं वर्ष होतं. महिना
मार्चचा, तारीख होती २४, स्थळ
होतं आफ्रिकेतील अल्जिरीया हा देश. दुसरं महायुद्ध रंगात आलं होतं आणि महायुद्धाच्या
त्या धामधुमीत 'जो' चा जन्म झाला. अल्जिरीयाही अमेरिकन आणि
जर्मन सैनिकांसाठी रणमैदान बनलं होतं ह्या रणमैदानात असलेल्या एका सैनिकी तळावर
‘जो'चा जन्म झाला. लवकरच त्यालाही प्रशिक्षण देण्यात आलं, प्रशिक्षणानंतर जो
लष्करी सेवेत दाखल झाला.
१९४३ चे वर्ष
संपता-संपता युरोप हे महायुद्धाचं केंद्रस्थान बनलं. त्यामुळे अर्थातंच ‘जो' ची
रवानगी युरोपात झाली. ब्रिटीश आणि भारतीय सैन्याने संपूर्ण हल्ला केलेलं
मुसोलीनच्या अधिपत्याखालील इटाली हे जोवं कार्यक्षेत्र झालं. 'जो' ला जगभरात
प्रसिद्धी मिळाली ती तेथेच. इटालीतल्या कोल्बी विंची येथे त्याने केलेल्या पराक्रमामुळे.
ब्रिटीश - भारतीय
लष्कर इटालीत शिरल्यानंतर त्यांची दमदार वाटचाल सुरु होती. मात्र कोल्बी विंची
ह्या गावाजवळ ही आगेकूच रोखली गेली. व्यूहात्मक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या
ह्या गावाच्या रक्षणासाठी इटालीयनांनी जय्यत तयारी केली होती. त्यातच कडवे लढवय्ये
असलेल्या जर्मन सैन्याचीही त्यांना साथ होती. अगदी हातघाईच्या तुंबळ युद्धानंतरही
कोल्बी विंची जिंकणं ब्रिटीशांना शक्य झालं नाही. तेव्हा दोस्ताच्या हवाईदलाची मदत
घेण्याचं नक्की करण्यात आलं. तसा बिनतारी संदेश पाठविण्यात आला.
संदेश मिळाल्यानंतर हवाई हल्ल्यासाठी
१८ ऑक्टोबर १९४३ चा दिवस निश्चित करण्यात आला. त्याची तयारी जोरात करण्यात आली.
मात्र तेथे कोल्बी विंचीला परिस्थिती पालटली होती. ब्रिटीश भारतीय सैन्याने
इटालीयन – जर्मन सैनिकांची फळी फोडून आत प्रवेश मिळविला
होता. एवढेच नव्हे तर शत्रुसैन्याला कंठस्नान घालून तर अनेकाना युद्धकैदी बनवून
कोल्बी विंचीचा ताबाही घेतला. त्यामुळे हवाई हल्ल्याची गरज राहिली नव्हती. कोल्बी
विंची जिंकल्याची बातमी हवाई तळाला कळविण्यासाठी कमांडर आपल्या बिनतारी संदेशवहन
यंत्रापाशी आला. मात्र यंत्रांची झालेली मोडतोड पाहताच त्याच्या काळजात खड्डा
पडला.
भीतीचं
कारण स्पष्ट होतं. हवाई हल्ल्याची निर्धारीत वेळ जवळ आली होती. हवाई हल्ल्याआधीच
कोल्बी विंची जिंकल्याची माहिती हवाई दलाला नव्हती. त्यामुळे हवाई हल्ला निश्चित
होता. आणि ब्रिटीश - भारतीय फौजेला त्याचा प्रचंड फटका बसणार होता. १,१०० ब्रिटीश
- भारतीय सैनिकांचे जीवन धोक्यात आलं होतं.
ब्रिटीश
कमांडटने संदेशाचा कागद जो' च्या पायाला बांधला. अकराशे ब्रिटीश-भारतीय सैनिकांचं
जीवन त्या कागदात बंदिस्त झालं होतं. असा हा किंमती कागद घेऊन ‘जो' ने उड्डाण
केले. विमानतळ कोल्बी विंचीपासून ३५ किलोमीटर लांब होता. 'जो' तेथे पोहोचला तेव्हा
विमानतळावर विमानं आपल्या पोटात बॉम्ब घेऊन सज्ज होती. वैमानिक केवळ उड्डाणाची
आज्ञा मिळण्याची वाट पाहात थांबले होते. त्यांना शेवटची आज्ञा वैमानिकांना मिळालीच
नाही.
हा एकच पराक्रम करून ‘जो' थांबला नाही. पुढे त्याने
आणखी तीन पराक्रम वेगवेगळ्या ठिकाणी करून दाखविले. त्याच्या ह्या
योगदानाबद्दल त्याला पुढे सर्वोच्च लष्करी पदकाने सन्मानित करण्यात आलं. अमेरिकन
लष्कराने त्याला G. I. म्हणजे रितसर सैनिक म्हणून लष्करी सेनेत दाखलही करून
घेतले.
(श्री. पंकज कालुवाला
यांच्या “विस्मयकारक सजीव सृष्टी” या पुस्तकातून साभार )
विस्मयकारक सजीव सृष्टी
लेखक -- पंकज कालुवाला
प्रकाशक – परममित्र पब्लिकेशन्स, ठाणे
मूल्यं – रू. 150/-
संपर्क - 9969496634
लेखक -- पंकज कालुवाला
प्रकाशक – परममित्र पब्लिकेशन्स, ठाणे
मूल्यं – रू. 150/-
संपर्क - 9969496634

Post a Comment