कुठल्याही सॉफ्टवेअरशिवाय कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त इमेजेस कसे डाऊनलोड कराल ?
कुठल्याही सॉफ्टवेअरशिवाय कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त इमेजेस कसे डाऊनलोड कराल -
बाजारात विविध कंपन्यांचे बल्क इमेज डाऊनलोडर उपलब्ध आहेत. त्यांचे तुम्ही ट्रायल वर्जन वापरू शकता. परंतु त्यात पूर्ण फिचर्स दिलेले नसल्यामुळे ते वापरण्यावर एक प्रकारची मर्यादा येते. तसेच सर्वच सॉफ्टवेअरचे लायसन्स विकत घेणे आपल्याला परवडण्यासारखेही नसते. जे महत्वाचे वैशिष्ट्य अशा सॉफ्टवेअरमध्ये वापरले जाते त्याचाच एका साध्या कमांडद्वारे आपण वापर करून घेऊ शकतो. तो कसा ते आता आपण बघू या -
सामान्यत: इंटरनेटववरून इमेजेस डाऊनलोड करण्यासाठी ओपन केलेल्या इमेजवर आपण माऊसचे राईट बटन क्लिक करतो व आलेल्या पर्यायापैकी save image as किंवा copy image हे पर्याय वापरुन ती इमेज हव्या त्या ठिकाणी आपण कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करून घेतो. एखादीच इमेज हवी असल्यास हा पर्याय ठीक आहे. परंतु ओपन केलेल्या वेब पेजवरील एकाहून अधिक इमेजेस आपल्या कामाचे असल्यास तसेच ते डाऊनलोडही करून घ्यावयाचे असल्यास काय करावे ? ट्रिक सोपी आहे. फक्त ओपन केलेल्या वेब पेजवरील फाईल (file) मेनूमधील save page as हा पर्याय निवडावा. नंतर save as या आलेल्या डायलॉगबॉक्समार्फत आपल्या हव्या त्या नावाने किंवा डिफॉल्ड नेम ने तो पेज आपण हव्या त्या ठिकाणी सेव्ह करून घ्यावा. पेज पूर्ण सेव्ह करून झाल्यानंतर त्या वेब पेजबरोबरच त्या पेजवरील सर्व इमेजेसही (त्या पेजवर दिसत असलेल्या मूळ आकारात) आपोआप डाऊनलोड केल्या जातात. सेव्ह केलेल्या ठिकाणी त्या नावाचा फोल्डर व त्या बाहेर त्या नावाची html file आपल्याला दिसून येते.
खालील विडीओ टयूटोरीयल पहा.
बाजारात विविध कंपन्यांचे बल्क इमेज डाऊनलोडर उपलब्ध आहेत. त्यांचे तुम्ही ट्रायल वर्जन वापरू शकता. परंतु त्यात पूर्ण फिचर्स दिलेले नसल्यामुळे ते वापरण्यावर एक प्रकारची मर्यादा येते. तसेच सर्वच सॉफ्टवेअरचे लायसन्स विकत घेणे आपल्याला परवडण्यासारखेही नसते. जे महत्वाचे वैशिष्ट्य अशा सॉफ्टवेअरमध्ये वापरले जाते त्याचाच एका साध्या कमांडद्वारे आपण वापर करून घेऊ शकतो. तो कसा ते आता आपण बघू या -
खालील विडीओ टयूटोरीयल पहा.
माहिति चांगलि आहे....
जवाब देंहटाएं