इंटरनेटवरून व्हिडिओ डाऊनलोड करण्याच्या काही सोप्या पद्धती
मित्रांनो आज
मी तुम्हाला सांगणार आहे इंटरनेटवरून व्हिडिओ डाऊनलोड करण्याच्या काही सोप्या
पद्धती. त्यासुद्धा
अगदी स्टेप बाय स्टेप.
प्रथम इंटरनेटवरून व्हिडिओ डाऊनलोड कसे करावे हे पाहण्याआधी तुमच्या
कम्प्युटरमध्ये Adobe Flash Player इंस्टॉल आहे किंवा नाही ते पहा. हा प्लेयर
सिस्टमध्ये इंस्टॉल नसल्यास तसेच नीट कार्यरत नसल्यास महाजालावरील कुठल्याही
प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला पाहता येणार नाही. व पर्यायाने तो
व्हिडिओ डाऊनलोड करणेही शक्य होणार नाही.
Adobe
Flash Player इंस्टॉल करण्यासाठी येथे क्लिक करा. या साईटवर जाऊन मॅन्यूयली तुमच्या ब्राऊजर निवडीनुसार त्याशी निगडीत Flash
Player डाऊनलोड करा. Player डाऊनलोड
झाल्यानंतर ब्राऊजर बंद करा. प्लेयर इंस्टॉल करा. व पुन्हा वेब ब्राऊजर सुरू करा. You tube किंवा तत्सम
साईट उघडून त्यावरील असलेला हवा तो व्हिडीओ सुरू करुन पहा. व्हिडीओ नीट दिसत
असल्यास आपला फ्लॅश प्लेयर व्यवस्थित इंस्टॉल झाला आहे असे समजा.
महाजालावरील व्हिडिओ आपण काही प्लग इन तसेच काही
सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कम्प्युटरमध्ये डाऊनलोड करुन घेऊ शकतो. ते कसे ते आता पाहू
या.
1) Ant Video Downloader – हा व्हिडिओ
डाऊनलोडर Mozilla Firefox व internet explorer साठी compatible आहे. याचे प्लग इन
ब्राऊजरमध्ये इंस्टॉल केल्यानंतर वरील
दोन्ही प्रकारच्या बाऊजरवरील टूलमार्फत व्हिडिओ डाऊनलोड करण्याचे काम केले जाते.
यात जवळ जवळ बर्याच प्रकारचे व्हिडिओ फोरमॅट असलेले व्हिडिओ डाऊनलोड करण्याचे
वैशिष्टय आहे. येथे आपण Mozilla Firefox साठी याचे
इंस्टॉलेशन कसे केले जाते ते पाहणार आहोत. प्रथम येथे क्लिक
करून या साईटवर जा. तुम्हाला खालील चित्राप्रमाणे वेब पेज दिसेल.
वेब पेजवर आल्यानंतर प्रथम आपला Mozilla Firefox या डाऊनलोडरच्या add-on साठी compatible आहे किंवा नाही ते पहा. Old version धारकांना त्याप्रमाणे आधी Firefox चे जुने वर्जन काढून नवीन वर्जन इंस्टॉल करणे
गरजेचे असते. याची माहिती तुम्हाला वेब पेजवरील Application
details मध्ये मिळू शकते. अधिक समजण्याकरीता
खालील चित्र पहा.
आता वेब पेजवर दिसत असलेल्या download for Firefox या बटणावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर
खालील प्रमाणे वेबपेजवर क्रिया होताना दिसून
येईल.
थोडा वेळ थांबा. पुढे तुम्हाला प्लग इन इंस्टॉल करण्याचा डायलॉगबॉक्स दिसून येईल. खालील चित्र पहा.वर्तुळात दाखविलेल्या डायलॉगबॉक्समधील Install Now या पर्यायावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर पुढील चित्रात वर्तुळात
दाखविलेल्या रिस्टार्ट पर्यायावर क्लिक करुन ब्राऊजर
पुन्हा सुरु होण्याची वाट पहा.
ब्राऊजर सुरु झाल्यानंतर ब्राऊजरवरील
स्टँडर्ड टूलबारवर Downloader
चे प्लग इन दिसू लागेल.
पुढे महत्वाचे हे कि, हा add-on ब्राऊजरमध्ये इंस्टॉल झाल्यानंतर त्याचे
कन्फिगरींग करणे. महाजालावरील व्हिडिओ डाऊनलोड होत असताना त्याची एकच सलग फाईल डाऊनलोड
होत नसते, तर त्याचे निरनिराळ्या भागातील तुकडे एका विशिष्ट पॅकेटद्वारे पाठविले जात असतात. सरतेशेवटी त्याचे एकत्रिकरण होऊन
ती संपूर्ण फाईल आपल्या पीसीत डाऊनलोड होते. फाईल एकत्र जोडून डाऊनलोड करण्याकरीताच या प्लग इन सोबत एका converter ची गरज असते. मॅन्युअली पीसीत इंस्टॉल केलेला एखादा converter ही यासाठी वापरात येऊ शकतो, पण तो तितकासा नीट काम करेलच असे सांगता
येणार नाही. Converter कोणता व कसा इंस्टॉल करावा याचे विवेचन
मी माझ्या व्हिडिओ ट्यूटोरीअलमध्ये केलेले आहेच.
तर मग आता पुढे काय........? प्रत्यक्ष पुढील व्हिडिओ पाहूनच करुन पहा.............
2) Real Player-
वेळेअभावी पुढील दोन सॉफ्टवेअरविषयी अधिक माहिती न देता सरळ YOUTUBE वरील डेमो येथे देत आहे. पुढे यथावकाश याविषयी अधिक जाणून घेऊ.
2) Real Player-
3) Internet Download Manager -






Post a Comment