करोना वायरस ! सफाई कामगारांना धन्यवाद. Corona Virus ! Salute For Cleaning Workers.



         करोनासारख्या साथी येतील आणि जातील,पण याआधी,आता आणि नंतरही आमच्या सफाई कामगार बंधुभगिनींचं महत्व कायम राहणार आहे. खरंतर समाजाच्या, देशाच्या आणि एकूणच विश्वाच्या आरोग्यासाठी लढणारी,सगळ्यात जास्त धोका पत्करणारी आणि आपलं कर्तव्य निष्ठेने बजावणारी ही आघाडीची पहिली फळी आहे.

        त्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता आणि सन्मानाची भावना आहेच. समाजाचा आणि देशाचा मोठा आधारस्तंभ असलेल्या सफाई कामगारांना विशेष सन्मानाने वागवलं पाहिजेच, पण त्यांच्या स्वताच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठीही समाजातूनच भक्कम पाठबळ उभं राहिलं पाहिजे. काही ना काही त्यांच्यासाठी करावच लागेल.
        पण सफाई कामगारांच्या ऋणांतून समाजाला कधीही उतराई होता येणार नाही हेही तितकच खरं !

  : पंकज कालुवाला



कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.